भाजपाच्या मॅनेजमेंट टीममध्ये विनोद तावडे, भारती पवार

0
169

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजपसाठी ही निवडणूक फारशी कठीण नसली तरी मित्रपक्षांसह सर्व विरोधी पक्षांशीही संवाद साधत उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आता भाजपने ‘मॅनेजमेंट टीम’ तयार केली आहे. संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या टीमवर असणार आहेत.

राष्ट्रपती पदाची निडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यासाठी भाजपने तयार केलेल्या व्यवस्थापन टीममध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. तावडे आणि भाजपचे सरचिटणीस हे दोघे या टीमचे सहनिमंत्रक आहेत. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत टीमचे निमंत्रक आहेत. एकूण 14 जणांची ही टीम काम करणार आहे.

व्यवस्थापन टीममध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, अश्विनी वैष्णव, सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, तरूण चुघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के. अरूणा, राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्य7ा वनती श्रीनिवासह, राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि आसामचे उपाध्यक्ष खासदार राजदीप रॉय यांचाही समावेश आहे.

दरम्यान, भाजपने सर्व मित्रपक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये रणनिती आखण्यात येत आहे. विरोधकांकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असताना भाजपकडून उमेदवारावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. उद्धव ठाकरे-राजनाथ सिंह यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे, हे दोन्ही नेते भेटणार असल्याची समजते. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा काल फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे.