दि.१४- (पीसीबी)मुंबईमध्ये ड्रग्जच्या अती सेवनाने दोघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. गोरेगावमधील नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून मृतांमध्ये एका तरुणीचा समावेश आहे. नेस्कोने आयोजित केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजार जण उपस्थित होते. ड्रग्ज ओव्हरडोस घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणखी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेस्कोकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही घटना परवा संध्याकाळी घडल्याची माहिती समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात 11 एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुणांना त्रास झाला.
दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थ्यांनी उपचार करुन सोडून देण्यात आलं असलं तरी काहींची प्रकृती खालवल्यामुळे यातील 2 तरुणींना मुंबईच्या जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आता या प्रकरणामध्ये कोणी हे ड्रग्ज पुरवले, कोणते ड्रग्ज घेण्यात आले याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. आयोजकांचाही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे














































