१ मे पासून रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी सक्ती

0
2

दि.१४(पीसीबी)-राज्याच्या परिवहन विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. इतकंच नाही तर ज्यांना मराठीचं ज्ञान नसेल त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का? याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील