भाजपच्या शहर कार्यालयात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन

0
610

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त वाजपेयी यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन करण्यात आले.

भाजपच्या मोरवाडी येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर आर. एस. कुमार यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कविता अभिवाचनाला सुरुवात झाली.

कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी सुरेश कंक होते. यावेळी भाजप दक्षिण भारतीय  अघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले उपस्थित होते. वाजपेयी यांच्या कवितांचे उज्वला केळकर, राज अहेरराव, मधुश्री ओव्हाळ, राजेंद्र धावटे, शोभा जोशी, अंतर देशपांडे, शरद शेजवळ, विनिता माने, सुहास घुमरे यांनी वाचन केले. वाजपेयी यांच्या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद मानसी चिटणीस यांनी सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय सचिव रामकृष्ण राणे यांनी केले. नगरसेवक शीतल शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संजय परळीकर, आझाद शेख, संजीवनी पांडे यांनी परिश्रम घेतले.