नागपुरातून देशाचे सरकार चालत नाही – मोहन भागवत

0
618

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – राजकारणावर आमचा कोणताही प्रभाव नाही आणि त्यांच्या सरकारवरही आमचा प्रभाव नाही. ते स्वयंसेवक आहेत. त्यांचाही स्वतःचा विचार आहे. या स्वातंत्र्याने आणि स्वायत्ततेनेच सरकार चालवले जाते. नागपुरातून देशाचे सरकार चालत नाही, असा टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विरोधकांना लगावला.

दिल्लीत ‘भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी मोहन भागवत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आरएसएसकडून मागितला तरच सल्ला दिला जातो. हा जो अंदाज लावला जातो, की नागपुरातून फोन जातो. सल्ला दिला जातो की कुणी काय करायचं? हे सर्व खोटे आहे. त्यांना सल्ला हवा असेल, तरच सल्ला दिला जातो. राज्य घटनेनुसार सत्तेचे केंद्र अबाधित राहिले पाहिजे, असे संघाचे मत असून तसे न झाल्यास ते चुकचेच असेल, असेही ते म्हणाले.