पिंपरीत कारवाईपूर्वी नागरिकांना पार्किंग नियमांची उजळणी

0
691

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित सुरु असावी म्हणून पोलिसांनी कंबर कसली असून कारवाईपूर्वी वाहन धारकांना नियमांची उजळणी करुण देण्याच्या उद्देशाने आज (मंगळवार) पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंग नियमांबाबत जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व चौकांमध्ये वाहतूक नियम आणि जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यासमोरील चौकामधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या चौकामध्ये ‘सिग्नलच्या आजूबाजूस १०० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करू नये. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वाहन जप्त करण्यात येईल.’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आले आहेत. वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे कारवाईपूर्वी वाहन धारकांना नियमांची उजळणी व्हावी म्हणून आज पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंग नियमांबाबत जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले.