भाजपकडून मध्यावधी निवडणुकांची तयारी??

0
333

मुंबई,दि.(पीसीबी) – महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र, शिवसेनेनं पाठिंबा न दिल्यानं भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. बहुमताचा आकडा गाठण्यास असमर्थ असणाऱ्या भाजपनं मध्यावधी निवडणुका घेण्याची तयारी सुरु केल्याचं दिसतं चित्र आहे.

भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी आपला कार्यक्रम जाहीर केला आहे. पक्षाकडून संघटनात्मक पुनर्बांधणीकडे लक्ष देण्यास सुरु झालं आहे. कार्यकर्ते, नेते यांना मजबूत करुन नव्याने बांधणी करण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपकडून दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात. भाजप कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रावर मध्यावधी निवडणुका लादू इच्छीत नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास पक्षानं तयार रहावं, यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याची चर्चा होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीवेळी ‘मी पुन्हा येईन’ असं म्हटलं होतं. त्याच दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय