भांडण थांबवण्यास सांगून सुद्धा भांडण सुरूच ठेवले; तेव्हा पोलिसांनी केलं असं काही…

0
402

चाकण, दि. १३ (पीसीबी) – आपसात भांडण सुरु असताना पोलीस भांडण सोडविण्यासाठी आले. मात्र पोलिसांकडे कानाडोळा करून तिघांनी त्यांच्यातले भांडण सरूच ठेवले. याबाबत तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली. कोंडीबा बाबाराव गायकवाड (वय 25, रा. दैठणा, ता. जि. परभणी. सध्या रा. झीत्राईमळा, चाकण), वैभव मधुकर गोरे (वय 21, रा. मिरकेल, ता. जि. परभणी. सध्या रा. बिरदवडी, ता. खेड), कुणाल माणिक नायकोडी (वय 21, रा. झीत्राईमळा, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार विठ्ठल रेंगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी आपापसात भांडण करत होते. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी पोलीस हवालदार रेंगडे आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी गेले. भांडण करणा-यांना समजावून सांगत त्यांना बाजूला घेत असता आरोपींनी पोलिसांच्या आदेशाला झुगारून त्यांचे भांडण सुरूच ठेवले. याबाबत तिघांच्या विरोधात दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.