ब्रिटिश कंपनीकडून संभाव्य लशीचं उत्पादन सुरू, पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटशी करणार करार

0
347

लंडन, दि.६ (पीसीबी) – अॅस्ट्राझेनिका नावाच्या ब्रिटीश औषध उत्पादक कंपनीने कोरोना व्हायरसवरच्या संभाव्य लशीसाठीचं उत्पादन सुरू केल्याचं कंपनीच्या प्रमुखांनी बीबीसीला सांगितलं आहे.
या लशीच्या चाचण्या सध्या घेण्यात येत असल्या तरी यासाठीच्या घटकांची निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे लस उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्यास त्यासाठी मागणी पूर्ण करणं शक्य होईल, असं कंपनीचे प्रमुख पास्कल सोरायट यांनी बीबीसीला सांगितलं.
“आम्ही आताच लस उत्पादनाला सुरुवात करत आहोत. निकाल हाती येईपर्यंत ही लस वापरण्यासाठी आपल्याकडे तयार असायला हवी,” त्यांनी सांगितलं. या लशींच्या २ अब्ज डोसेसचं उत्पादन करणं आपल्याला शक्य असल्याचं अॅस्ट्राझेनिका कंपनीचं म्हणणं आहे.
निर्मितीची प्रक्रिया आताच का सुरू करण्यात आली, याविषयी बीबीसीच्या ‘टुडे’ या कार्यक्रमात बोलताना सोरायट म्हणाले, “आम्हाला हे लवकरात लवकर करायचं आहे. अर्थातच असा निर्णय घेण्यामध्ये धोका आहे. पण हा आर्थिक धोका आहे. लस प्रभावी न ठरणं हे आर्थिक संकट ठरू शकतं. असं झालं तर लसीसाठी लागणाऱ्या ज्या घटकांचं आम्ही उत्पादन केलंय, ते सारं फुकट जाईल.”
जागतिक साथीदरम्यान या लशीची निर्मिती आणि उत्पादन करताना त्यातून नफा कमावण्याचा कंपनीचा हेतू नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. ही लस प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध झाल्यास कंपनी २ अब्ज लशींची निर्मिती करेल. यासाठी दोन करार करण्यात येणार आहेत. यापैकी एक करार बिल गेट्स यांच्यासोबत करण्यात येईल तर दुसरा पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सोबत करण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही जगभरातली सर्वांत जास्त लसनिर्मिती करणारी संस्था आहे. लघु आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना 1 अब्ज लशींचा पुरवठा करण्यासाठीचा करार भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटसोबत करण्यात येईल. यापैकी 40 कोटी लशी या 2020 वर्षअखेरपर्यंत पुरवण्यात येतील.
बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या दोन आरोग्यविषयक संघटनांसोबत 750 दशलक्ष डॉलर्सचा करार करण्यात येणार आहे. कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इन्होवेशन्स (Coalition for Epidemic Preparedness Innovations) आणि GAVI व्हॅक्सिन्स अलायन्स या दोन संस्था या लसनिर्मितीसाठी मदत करतील आणि लशीच्या 30 कोटी डोसेसचं वितरण करतील. या वर्षाच्या अखेरपासून या लशीची डिलीव्हरी सुरू होणं अपेक्षित आहे.
या अॅस्ट्राझेनिका कंपनीने तयार केलेली AZD1222 लस परिणामकारक आहे वा नाही याविषयीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत येणं अपेक्षित असल्याचं सोरायट यांनी सांगितलं. पण ही लस प्रभावी ठरणार नाही, अशीही शक्यता असल्याचं CEPIचे चीफ एक्झिक्युटिव्ह रिचर्ड हॅचेट यांनी म्हटलंय. असं असलं तरी अॅस्ट्राझेनिका कंपनी जगभरामध्ये या संभाव्य लसीसाठीची पुरवठा साखळी उभारत आहे. आतापर्यंत या लशीच्या 2 अब्ज डोसेसची निर्मिती करता येईल यासाठीची उत्पादन यंत्रणा नक्की करण्यात आलेली आहे.
“आपल्याकडे लस असं एक बाब आहे. पण तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणं गरजेचं आहे. आणि हे करणं सोपं नाही,” सोरायट म्हणाले.
अॅस्ट्राझेनिका कंपनीने या संभ्याव लशीचे ३० कोटी डोस अमेरिकेला देण्याचं मान्य केलं असून 10 कोटी लसी युकेमध्ये देण्यात येणार आहेत. सप्टेंबरपासून यासाठीची डिलीव्हरी सुरू होणं अपेक्षित आहेत.
आणखी सहा लशींवर काम सुरू
कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी जगभरात लस शोधण्यासाठीची संशोधनं सुरू आहेत. जाणकारांच्या मते ज्या पद्धतीने जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते असामान्य, अद्भूत, अभूतपूर्व असे आहेत. एक लस शोधण्यासाठी अनेक वर्ष लागतात, कधीकधी तर काही दशकंसुद्धा जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर नुकतीच ज्या आजारावर लस आली आहे त्या इबोलाचं घेता येईल. इबोलाची लस यायला 16 वर्षं लागली.
लस तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. त्याचे अनेक टप्पे असतात… टप्प्यांचे उपटप्पे असतात. त्यामुळे लस तयार करायला अनेक वर्षं लागणं स्वाभाविक आहे. पहिला टप्पा प्रयोगशाळेतला असतो. दुसरा प्राण्यांवर चाचणीचा असतो. चाचण्यांमध्ये लस सुरक्षित असल्याची खात्री पटली आणि रोगप्रतिकारक शक्ती दिसू लागली की त्या लशीची माणसांवर चाचणी घेतली जाते. याला ह्युमन ट्रायल म्हणतात.

त्या 6 स्पेशल लशी कोणत्या?
माणसांवर लशीची चाचणी घेण्याची प्रक्रियासुद्धा तीन टप्प्यांची असते. पहिल्या टप्प्यात भाग घेणाऱ्या लोकांची संख्या कमी असते आणि ते सुदृढ असतात. दुसऱ्या टप्प्यात भाग घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. शिवाय हे कंट्रोल ग्रुप्स असतात. लस माणसांवर किती सुरक्षित आहे, हे या टप्प्यात तपासलं जातं. कंट्रोल ग्रुप म्हणजे असे लोक जे चाचण्यांमध्ये भाग घेणाऱ्या इतर लोकांपासून वेग