बोपखेल येथे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला साडेपाच लाखांचा गंडा

0
571

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला दोघाजणांनी मिळून तब्बल ५ लाख ५६ हजार ७७८ रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १ फेब्रुवारी ते ५ जुन २०१९ दरम्यान बापुजीबूवा मंदीर चौक, पीसीएमसी शाळेसमोर, बोपखेल येथे घडली.

याप्रकरणी रोहन शांताराम घुले (वय ३७, रा. बापुजीबूवा मंदीर चौक, पीसीएमसी शाळेसमोर, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राकेश सिंग आणि अमित मिश्रा (दोघेही रा. बँगलोर) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन हे व्यावसायिक आहेत. १ फेब्रुवारी ते ५ जुन २०१९ या कालावधीत आरोपी राकेश आणि अमित या दोघांनी त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांना वेळोवेळी विविध बँक खात्यात एकूण ५ लाख ५६ हजार ७७८ रुपये भरण्यास सांगितले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी रोहन यांना कर्ज मिळवून दिले नाही. तसेच दिलेले पैसेही परत केले नाही. यावर रोहन यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.