राज ठाकरेंसोबतचे वैर विसरलोय – छगन भुजबळ

0
568

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर  घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, असे सांगून राज ठाकरेंच्या सभांचा फायदा काँग्रेस आघाडीला होईल, असे राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ  यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ आज ( बुधवार) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या वादावर भाष्य केले. राज ठाकरे यांच्या सभेचे वेगळेपण  आहे.  त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण असते, अशी स्तुतीसुमने त्यांनी राज यांच्यावर उधळली.

छगन भुजबळ म्हणाले की,  राज ठाकरे यांच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती, तर ती मते सैरभैर झाली  असती. यातील काही मते शिवसेना तर काही मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण त्यांनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.