बेवकूफ, एकत्र राहण्याच्या काळात असं बोलाल तर १५ कोटीच रहाल – जावेद अख्तर

0
370

कोल्हापूर,दि.२१(पीसीबी) – बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही १५ करोडच राहाल, असा सल्ला गीतकार जावेद अख्तर यांनी एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

वारीस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. जावेद अख्तर यांनीही वारीस पठाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी आहे, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केलं होतं.

त्यावर १५ करोडचा ठेका तुम्हाला कोणी दिला? आशा लोकांपासून सावध राहीलं पाहिजे, असं म्हणत अख्तर यांनी वारीस पठाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही १५ करोडच राहाल, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.