मुख्यमंत्री आज दिल्लीच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींची सोनिया गांधींची घेणार भेट

0
392

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शुक्रावारी राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी  पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.