‘बिहारमध्ये पुन्हा एनडीए’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
236

पाटणा, दि. २३ (पीसीबी) – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखल होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदीही एनडीएच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून, सासाराम येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादवांसह विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला.

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

“बिहारच्या पुत्रांनी तिरंग्यासाठी आणि भारत मातेची मान उंच ठेवण्यासाठी गलवान व्हॅलीत बलिदान दिलं. पुलवामा हल्ल्यातही बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो,” असंही मोदी म्हणाले.
सत्तेतून बेदखल केल्यानंतर हे लोक भ्रमिष्ट झाले आहे. राजदनं युपीएमध्ये राहून बिहारी लोकांवर आपला राग काढला. राजदनं नितीश कुमार यांचे दहा वर्ष वाया घालवले. नंतर १८ महिन्यांचं सरकार आलं, तेव्हा काय काय खेळ खेळले हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा नितीश कुमार यांना हा खेळ समजला, तेव्हा त्यांना सत्ता सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही नितीश कुमार यांच्यासोबत आलो आहे.