‘बायोटेक’च्या कोरोना लस चाचणीचा तिसरा टप्पा

0
285

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून ‘कोव्हॉक्सीन’ नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचली असल्याची माहिती समोर आली आहे.

2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग्स कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे परवानगी मागीतली होती. DCGIने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली असून, लवकरच तिसऱ्या चाचणीला सुरुवात केली जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या एकूण 28,500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. ‘कोव्हॉक्सीन’ लसीची चाचणी ही देशात एकूण सहा ठिकाणी केली जाणार आहे.