बिजलीनगरमध्ये घरफोडी करुन चोरट्यांनी पळवले सोन्याचे दागिने

0
565

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – बंद घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील तब्बव ४९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी दहाच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथून उघडकीस आली.

याप्रकरणी मनीष मनोहर भुजबळ (वय ५०, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष यांचे बिजलीनगर येथे घर आहे. सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी दहा या वेळेत त्यांचे घर कुलुप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.  तसेच घरातील ४९ हजार ५०० रुपये किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चिंचवड पोलीस आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.