बावधनमध्ये विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ; सासरच्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा

0
501

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – विवाह जुळवणाऱ्या ऑनलाईन साईटवरून लग्न झाल्यानंतर वर्षभरातच पती-पत्नीत मतभेद झाले. सासंरच्या मंडळींनी विवाहितेला जातीवाचक शिवीगाळ करत वेळोवेळी मारहाण केली. हा प्रकार बावधन, वाकड आणि वसई येथे घडला.

याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी पती स्वप्नील वेर्णेकर (वय २९), सासरे साईनाथ दिगंबर वेर्णेकर (वय ६०), सासू स्नेहल वेर्णेकर (वय ५५), दीर भरत हळदणकर (वय ३२), मामा प्रशांत किसन पोतदार (वय ४३), मावशी भारती मुकेश पुरोहित (वय ५०), काका मुकेश पुरोहित (वय ५२, सर्व रा. बावधन) यांच्या विरोधात अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि स्वप्नील यांचा ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी विवाह झाला. दोघांचीही जात वेगवेगळी आहे. दोघेही उच्चशिक्षित असून हिंजवडी येथे वेगवेगळ्या कंपन्यात काम करतात. लग्नानंतरा किरकोळ कारणांवरून पती-पत्नीत कुरबुर होऊ लागली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला जातीवाचक बोलत अपमानित करण्यास सुरूवात केली. अखेर विवाहितेने हिंजवडी पोलिसात धाव घेतली. वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव तपास करत आहेत.