बापरे! भिशीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने महिलांची 60 लाखांची फसवणूक

0
196

पुणे, दि.२१ (पीसीबी) : पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन दहा ते अकरा महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. भिषित गुंतवणुक करण्यासाठी सांगून दहा अकरा महिलांची तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुजाता चेन्नकेशवल्लू रामगिरी व चेन्नकेशवल्लू चेन्नया रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2018 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व आरोपींची ओळख होती. आरोपीने तक्रारदार महिलेस बिशी मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर फिर्यादी आणि इतर दहा ते अकरा महिलांकडून तब्बल साठ लाख रुपये त्यांनी घेतले. भिशीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार या परतावा मागण्यास गेल्या असता त्यांना व इतर महिलांना परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.