बाथरूममधील पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

0
438

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – बाथरूममधील पाण्याच्या टाकीत पडून एका तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास नागपुरात घडली.

वंशिका मुकेश वर्मा (रा. डिप्टी सिग्नल परिसर, नागपूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशिका तिचे वडील, आजी आणि पाच वर्षाच्या एका भावासोबत कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात राहत होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ती घरात खेळत असताना बाथरूममधील पाण्याच्या टाकीत पडली. दोन तासानंतरही वंशिका न दिसल्याने वडील आणि आजीने तिचा शोध घेतला असता ती छतावरील पाण्याच्या टाकीत पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वंशिकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.