बाणेरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून आठ तरुणांची एकूण सव्वा लाखाची फसवणूक

0
601

बाणेर, दि. १८ (पीसीबी) – नोकरीचे आमिष दाखवून आठ तरुणांकडून प्रत्येकी २० ते २२ हजार रुपये असे एकूण १ लाख ९ हजार ५० रुपये उकळले. त्यानंतर तरुणांकडून इंटर्नशिपच्या नावाखाली तब्बल तीन महिने घरुनच काम करुन घेत फसवणूक केली. ही घटना बाणेर येथील मायक्रोइफोटेक कंपनी येथे घडली.

याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रियम (रा. सी. ५४/४९ सेक्टर नं.६२, नोएडा) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि त्यांच्या काही मित्रमैत्रिणींनी प्रियम याच्या कंपनीत कामासाठी अर्ज केला होता. यावर आरोपीने कामालावण्याचे आमिष दाखवून या आठही जणांकडून कुणाकडून २० तर कुणाकडून २२ हजार रुपये उकळले. तसेच मुलाखतीचा बनाव रचून तरुणांना सिलेक्ट झाल्याचे सांगून. त्यांच्याकडून तब्बल तीन महिने इंटर्नशिपच्या नावाखाली फुकट काम करुन घेतले आणि फरार झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.