डेटा सायन्सचे प्रशिक्षण देणाऱ्या मोरवाडीतील इन्स्टिट्यूटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

0
669

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – मोरवाडी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या इन्स्टिट्यूटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर तसेच विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटरचे संचालक प्रा. डॉ. विजय खरे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१९ ) उद्घाटन करण्यात येणार आहे. डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिस्टचे विविध प्रशिक्षण देणारी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ही एकमेवर इन्स्टिट्यूट असल्याचे संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सानिका कामतेकर यांनी सांगितले.

मोरवाडी येथील एमएसआर कॅपिटल इमारतीतील पहिल्या मजल्यावर सायंकाळी पाच वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, पीसीबीचे व्यवस्थापकीय संचालक समर कामतेकर आदी उपस्थित असतील.

सानिका कामतेकर म्हणाल्या, “डोमेन नॉलेजचा वेगाने प्रसार होत आहे. आज दूरसंचार, आयटी, विमा, निर्गुंतवणूक, आरोग्य, बँकिंग रिटेल, मिडिया, ई-कॉमर्स, तेल, गॅस, ऑटोमोबाईल, एअरलाइन्स, सरकार, स्वयंसेवी संस्था आणि स्टार्टअप यांसारख्या जवळपास सर्वच उद्योगांत एआय, एमएलए, डीप लर्निंग, डेटा सायन्सची मागणी भारतातच नव्हे तर जगातही वाढली आहे. जागतिक पातळीवर डेटा सायंटिस्ट आणि अॅडव्हान्स्ड अॅनालिस्टची मागणी सर्वात जास्त आहे. कंपन्या या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आकर्षित करण्यासाठी भरघोस वेतन देण्यास नेहमीच तयार असतात. त्यामुळे कंपन्यांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने मोरवाडी येथे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हे इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.”

डेटा सायन्स म्हणजे काय?

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे “डेटा”ला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. बाजारपेठेतील उत्पादनातील स्पर्धेचे आकलन करायचे असो किंवा निवडणूक निकालाचा कल जाणून घ्यायचा असो, डेटा संकलनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जागतिक पातळीवर डेटा सायंटिस्ट किंवा अॅडव्हान्स्ड अॅनालिस्टची मागणी सर्वाधिक वाढली आहे. आजच्या युगात गणित, सांख्यिकी, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, आर, पायथन, एसक्यूएल, एसएएसबरोबरच हाडोप आणि स्पार्कसारखे मोठ्या प्रमाणातील डेटा टूल्स आणि कांगोनोस, टॅब्लो, क्लिक व्यूसारखे व्हिज्युअलायजेशन टूल्सच्या माध्यमातून या क्षेत्रातील सखोल माहिती आणि व्यावहारिक कौशल्याने पारंगत असलेल्या डेटा सायंटिस्टची मागणी आहे.