बलात्कार प्रकरणी अभिनेता करण सिंह ओबेरॉयला अटक

0
443

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – अभिनेता करण सिंह ओबेरॉयला एका महिला ज्योतिषीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे.

ज्योतिषी महिलेने करणवर बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच करणने या महिलेकडे पैसेही मागितले होते. यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेने तक्रारीत म्हटले आहे, २०१६ मध्ये एका डेटिंगवर साईटव्दारे करण आणि मी भेटलो होतो. त्यानंतर आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर या महिलेने करणला आपल्या बंगल्यावर भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी करणने तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नारळपाणी व्दारे नशेचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याचा व्हिडिओ बणवून तिला ब्लॅकमेल केले. ओशिवारा पोलिसांनी करण याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.