बत्तीस हजारांची लाच घेताना खंडाळा महामार्ग पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात अटक

0
899

पुणे, दि. २९ (पीसीबी) –  खंडाळा महामार्ग पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल ३२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज (शनिवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली.

भरत तानु तांबीटकर (वय ५७) असे अटक करण्यात आलेल्या खंडाळा महामार्ग पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा ट्रक आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आरोपी भरत तांबीटकर यांनी तक्रारदाराच्या ट्रेलर ट्रक घाट रस्त्यावरुन पास करुन देण्यासाठी ३२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याप्रमाणे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून भरत तांबीटकर यांना लोणावळा हद्दीमध्ये महामार्गावर लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केले.

ही कारवाई पोलीस उप- अधीक्षक सुहास नाडगौंडा, पोलीस हवालदार करंदीकर, पोलीस हवालदार कृष्णा कुहे, किरण चिमटे यांच्या पथकाने केली.