बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात

0
578

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन फोटो सेशनही केले. त्यामध्ये हा आरोपी दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीच्याशिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ७० लाख रुपयांच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याचाही समावेश होता.

सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे तत्कालीन युवा जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याचे नाव पुढे आले होते. सध्या तो जामिनावर सुटला आहे. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शिष्टमंडळात समावेश केल्याने नागरिकांतून पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न  उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.