फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनीही पंतप्रधान मोदींना चोर म्हटले – राहुल गांधींचा आरोप  

501

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यानुसार अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल करारासाठी निवडण्यात फ्रान्सचा काहीही सहभाग नव्हता. याचाच अर्थ अनिल अंबानी यांना हजारो कोटींचे कंत्राट मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारात फेरफार केला होता.असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे.

आता फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या वक्तव्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या चोर म्हटले आहे. भारताच्या इतिहासात ही बाब बहुदा पहिल्यांदाच घडते आहे. यानंतरही पंतप्रधान सूचक मौन का बाळगले असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. संरक्षण मंत्री बोलतात आणि अरूण जेटली बोलतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत असे का? असाही प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला.

एवढेच नाही तर अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचे कंत्राट फक्त नरेंद्र मोदींमुळे मिळाले. सामान्यांचा पैसा नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातला असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. यावरूनच स्पष्ट होते आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारात भ्रष्टाचार केला असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.