फक्त तीन हजारात ‘या’ हॉस्पिटलमध्ये होत आहे ‘अँजीओग्राफी व मोफत अँजीओप्लास्टी व बायपास सर्जरी’

0
413

भोसरी, दि.१९ (पीसीबी) : भोसरी येथील मल्टीस्पेशालिटी 50 बेड व सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जित ओम हॉस्पिटल तर्फे भव्य ह्रदयरोग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ. अशोक अगरवाल यांनी दिली आहे.

या भव्य ह्रदयरोग शिबिराची माहिती देताना डॉ.अशोक अगरवाल म्हणाले की ओम मेडिकल फाऊंडेशन व लायन्स क्लब ऑफ तळवडे प्राईड च्या विशेष सहकार्याने हे शिबिर 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.

ओम हॉस्पिटल च्या अत्याधुनिक कॅथलॅब मध्ये गरजू ह्रदय रूग्णांवर फक्त 3 हजार रूपयांत अँन्जीओग्राफी केली जाईल. गरीब व गरजू रूग्णांवर अँन्जीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत केली जाईल. डॉ.अशोक अगरवाल आणि डॉ. सुनील अगरवाल म्हणाले की आज कुठला ही आजार न परवडणारा आहे. सर्व आजारांवरचे उपचार दिवसेंदिवस खूपच महाग होत चालले आहे. म्हणून आम्ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन तसेच रूग्णसेवा ईश्‍वरसेवा समजून आम्ही ओम मेडिकल फाऊंडेशन व लायन्स क्लबच्या विशेष सहकार्याने सर्व गोरगरीब तसेच गरजू रूग्णांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून कमीत कमी खर्चात सर्व आजारांचे उपचार ओम हॉस्पिटल मध्ये करतो.

पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी मधील कंपन्या, लघु उद्योगामध्ये काम करणार्‍या सर्व कामगारांनी व सर्व ह्रदय रूग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन ही डॉ.अशोक अगरवाल यांनी केले आहे.
सर्व ह्रदय रूग्णांवर सुप्रसिध्द डॉ.सुनील अगरवाल यांच्या कुशल नेतृत्वा खाली तज्ञ डॉक्टरांच्या टीम द्वारे तपासणी केली जाणार आहे.

उल्लेखनीय आहे की डॉ.सुनील अगरवाल पुणे शहरातील एक नामवंत कार्डिओलोजिस्ट असुन त्यांचा अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलोजिस्ट तर्फे फॅलोशिप देऊन सन्मान करण्यात आले आहेत. देश -विदेशातील ह्रदय रोगावर होणार्‍या सर्व अत्याधुनिक उपचाराची माहिती डॉ.सुनील यांना अवगत आहे. ओम हॉस्पिटल सर्व केंद्रीय कर्मचारी, धन्वंतरि, मेडिक्लेम, पोलिस कर्मचारी आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना साठी अधिकृत आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 8888825601/02 वर संपर्क साधावा.