प्रिया बिरारी, शिल्पी बॅनर्जी व शिष्यांच्या कथ्थक नृत्याने रसिक मंत्रमुग्ध

0
728

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – पिंपळेगुरव येथील निळू फुले रंगमंदिरात नृत्य आविष्कार २०१८ या कथ्थक नृत्य कार्यक्रमात प्रिया बिरारी व शिल्पी बॅनर्जी यांनी आपल्या शिष्यांसोबत कथ्थक नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे, कुंदा भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन जगन्नाथ काटे, शर्मिला मजुंदार, पी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या दिपाली जुगुळकर, अविनाश कामटिकर आदी उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “नागरिकांना भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या नृत्य कलेचा विसर पडला आहे. आजच्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा एवढा प्रभाव आहे कि भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी आदी सांस्कृतिक नृत्यांची नावे सुद्धा माहित नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये सांस्कृतिक नृत्याविषयी गोडी निर्माण होण्यासाठी “नृत्यअविष्कार” सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची खूप आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील व सागर बिरारी यांनी केले.