राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेत वादाची ठिणगी

0
761

मुंबई, दि. ८ (पीसीबी) –  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेत मंत्रिपदावरुन वादाला सुरुवात झाली आहे. या विस्तारात शिवसेनेच्या ग्रामीण भागातील आमदारांनी आपल्याला संधी मिळावी, यासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील आमदारांमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.  

दरम्यान, विस्तारात शिवसेनेला मंत्रिपदे मिळाली तरी आता केवळ ८-१० महिनेच निवडणुकीला राहिली आहेत. त्यामुळे पाच वर्षात जे झाले नाही, त्यावरुन शेवटच्या काही महिन्यांसाठी शिवसेनेत यावरून वाद सुरु झाला आहे.

दसऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे. या विस्तारात विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देऊ नका, या मागणीसाठी ग्रामीण भागातील आमदार शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेत विधान परिषदेचे आमदार विरुद्ध विधान सभेचे आमदार असा वाद सुरु आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेनेच्या ग्रामीण भागातील आमदाराचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आल्याने ग्रामीण भागातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.