प्राणघातक शस्त्रांची विक्री करणारा आरएसएसचा पदाधिकारी गजाआढ

0
1304

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – कर्ज फेडण्यासाठी कपड्याच्या दुकानाआढ प्राणघातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या आरएसएसच्या पदाधिकाऱ्याला कल्याण गुन्हे शाखेने तब्बल १७० प्राणघातक शस्त्रांसह अटक केली आहे.

धनंजय कुलकर्णी (वय ४९, डोंबिवली महावीरनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो आरएसएस आणि डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे. हे दुकान भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे २ लाख रुपयांचा आहे. यात पिस्तूलचाही समावेश आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण गुन्हे शाखेने धनंजया अटक करुन त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात केली आहे.