केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सर; अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अनुपस्थिती?

0
814

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मांडीमध्ये कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले आहे. जेटली तातडीने उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला त्यांची अनुपस्थिती जाणवण्याची शक्यता आहे.

जेटली यांच्यावर याआधी मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे जेटलींवर पुन्हा शस्त्रक्रीया करण्याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केल्याचे सांगतिले जात आहे. नव्या शस्त्रक्रीयेमुळे त्यांच्या मुत्रपिंडावर  ताण येण्याची शक्यता आहे, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

वैयक्तिक कामासाठी  दोन आठवड्यांसाठी न्यूयॉर्कला जात असल्याचे जेटली यांनी अधिकृत पत्रकाद्वारे  कळवले आहे.  मात्र, त्यांच्यावर शस्त्रक्रीया झाल्यास दोन आठवड्यात त्यांना रुग्णालयातून सोडण्याची   शक्यता कमी आहे. याचमुळे जेटली येत्या १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाला मुकण्याची शक्यता आहे.