प्रयागराज येथे मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले

0
496

प्रयागराज, दि. २५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचीही कृती पाहून उपस्थित चकीत झालेत. मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली. यानंतर मोदींनी कुंभमेळ्यात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुवून कर्मचाऱ्यांची मने जिंकली. 

यावेळी मोदी म्हणाले की, कुंभमेळ्यात स्वच्छता आणि साफसफाईचे काम करुन या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपण त्यांची सेवा करणे, हे भाग्य समजतो.

दरम्यान, या घटनेचा मोदींचा  व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल झाला आहे. मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोदींनी गंगा नदीची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन अनेकांना  चकीत केले. त्यांच्या ही कृतीमुळे नक्कीच प्रेरणादायी आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.