चिखली, रामदासनगर येथे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण  

0
789

भोसरी, दि. २५ (पीसीबी) –  शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने चिखली, रामदासनगर येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, दिनेश यादव, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  शंकर आवताडे  आदी उपस्थित होते.

शिवमुद्रा प्रतिष्ठानने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. कमीत कमी वेळेत ही संकल्पना पूर्ण केली आहे. परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरावर कायमस्वरूपी नजर राहणार आहे, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

रामदासनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हेतूने हा उपक्रम राबविला आहे.  सण समारंभ साध्या पध्दतीने साजरे करून त्यातून बचत झालेल्या पैशांमधून रामदासनगर रस्ता क्रमांक १, २ गणेशनगर रस्ता क्रमांक १, २ गिताई कॉलनी आणि अवधुत हौसिंग सोसायटी या परिसरात  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक गिताराम मोरे यांनी दिली.