पोलीस भरतीच्या नव्या पध्दतीविरोधात तरूण-तरूणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
847

पुणे, दि. ७ (पीसीबी) – पोलीस भरतीच्या नव्या पध्दतीविरोधात तरूण-तरूणींनी   जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (गुरूवार) मोर्चा काढला. हा मोर्चा मुठा नदीच्या पात्रातून काढून  जिल्हाधिकारी कार्यालयावर  नेण्यात आला.  तसेच ११ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर तरूण उपोषणाला बसणार आहेत.

पोलीस भरतीच्या प्रक्रियेत २ मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी पोलीस भरतीसाठी २०० गुणांची चाचणी घेण्यात येत असे. यामध्ये १०० गुणांची लेखी तर १०० गुणांची मैदानी चाचणी असायची. आता राज्य सरकारने यामध्ये बदल केले  आहेत. लेखीपरीक्षा आधी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण १०० वरुन ५० गुण केले आहेत. या दोन बदलांविरोधात आज या तरूणांनी मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राज्य सरकारकडून पोलिस दलातील रिक्त पदासाठी  जाहिरात काढली आहे. मात्र, नवीन भरतीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय तरूणांनी घेतला आहे.