राहुल गांधींच्या पाठोपाठ सोनिया गांधींनीही केले नितीन गडकरींचे कौतुक

0
803

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेत्या  सोनिया गांधी यांनीही  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभेत शून्य तासामध्ये नितीन गडकरींच्या मंत्रालयाशी संबंधित दोन प्रश्न घेण्यात आले. यावेळी देशभरात रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून सुरु असलेल्या तसेच रखडलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली. गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केलेल्या चांगल्या कामाचे सोनिया गांधी यांनी बाक वाजवून कौतुक केले. काँग्रेसच्या इतर खासदारांनीही त्यांना साथ दिली.

यावर मी येथे सर्व खासदारांचे आभार मानतो. राजकीय मतभेद विसरुन सर्व मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात माझ्या मंत्रालयाकडून कऱण्यात आलेल्या कामांचे कौतुक केले आहे, असे यावेळी  गडकरी यांनी सांगितले.