पोलीस उपनिरीक्षकाची व्हिडीओ शूटिंग करत अंगावर गेला धावून; पळून जायचा प्रयत्न करताच…

0
412

पिंपळे गुरव, दि. १२ (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने एका दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून दुचाकीस्वाराने कारवाई करणा-या पोलीस उपनिरीक्षकाची व्हिडीओ शूटिंग काढली. तसेच त्यांच्यासोबत झटापट करून ढकलून देत शासकीय कामात अढथळा निर्माण केला. याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे.

अमोल गोरक्ष निमसे (वय 39, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन लालप्पा जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे पोलीस उपनिरीक्षक असून ते सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. उपनिरीक्षक जाधव सोमवारी सकाळी रहाटणी फाटा, काळेवाडी येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी तिथून एका मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / ई एस 2417) आरोपी अमोल गेला. त्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने उपनिरीक्षक जाधव यांनी अमोलवर कारवाई केली. त्याचा राग आल्याने अमोल याने उपनिरीक्षक जाधव यांचा व्हिडिओ शूट केला. तसेच त्यांच्या अंगावर ओरडून झटापट करत ढकलून दिले. उपनिरीक्षक जाधव करत असलेल्या सरकारी कामात अमोल याने अडथळा निर्माण करून तो पळून गेला. पोलिसांनी अमोल याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.