जगातील ‘ही’ पाच रहस्यमयी कोडी ज्याची उत्तर शास्त्रज्ञांना सुद्धा सापडत नाहीयेत

0
594

अजूनही या जगात अशी काही रहस्ये आहेत जी न उलगडणारी आहेत. ती कोडी एक रहस्य बनून राहिली आहेत. मात्र, शास्त्रज्ञांनी काही रहस्यांवरून पडदा हटविला आहे, परंतु आजपर्यंत जगातील काही रहस्यमय गोष्टींची उत्तरे शास्त्रज्ञांनासुद्धा मिळालेली नाहीत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आजही रहस्य बनून राहिल्या आहेत, ज्या आजही प्रत्येकासाठी न समजण्यासारख्या कोड्या सारख्या आहेत. चला जाणून घेऊयात… 

  1. डान्सिंग प्लेग (Dancing plague of 1518)

१५१८ मध्ये, फ्रान्समधील स्ट्रासबर्ग शहरात अचानक बरेच लोक नाचू लागले. हे दिवसरात्र नाही लागले. दिवसाची रात्र झाली आणि रात्रीचा दिवस झाला तरी ते लोक नाचतच होते. त्यांचे काही केल्या नाचणे थांबत नव्हते.आणि असं नाचताना बरेच लोक मरण पावले. या सगळ्या प्रकाराला ‘नृत्य प्लेग’ (Dancing Plague) असे नाव देण्यात आले. परंतु, अद्याप सुद्धा या लोकांसोबत काय घडले हे रहस्य समोर आले नाहीये.

2. नाजका लाइन्सपेरूच्या नाझ्का वाळवंटात तयार झालेल्या या आकृती शास्त्रज्ञांसाठी एक कोड बनून राहिल्या आहेत. असं म्हणतात कि, या २०० हुन जास्त आकृत्या इथे तयार झाल्या आहेत. काहींचा असा विश्वास आहे कि, इथे एलियन्स ची विमान म्हणजेच ‘युएफओ’ उतरले होते. आणि त्यामुळे या आकृत्या इथे तयार झाल्या आहेत. पण हे खार आहे कि दुसरं कोणतं कारण आहे हे हि अद्याप रहस्य आहे.

3. डेथ वैलीकॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये अस्तित्वात असलेल्या आपोआप सरकलेल्या दगडांचे रहस्य शास्त्रज्ञांना समजू शकलेले नाही. वेगवेगळ्या वजनाचे असे अनेक दगड आहेत, जे पाहिल्यावर असे दिसते की ते आपोआप सरकत पुढे जात आहेत. तिथे ते सरकण्याचे पुरावे देखील आहेत, परंतु हे दगड पुढे आपोआप कसे सरकतात हे एक रहस्य आहे. जे वैज्ञानिक सुद्धा उलगडू शकले नाहीत.

4. डेविल्स धबधबे‘मिनेसोटा’ डेविल्स धबधबे हा जगातील सर्वात रहस्यमयी धबधबा मानला जातो. या धबधब्यात वरून पाण्याचे दोन प्रवाह पडतात. यापैकी एक प्रवाह खाली वाहतो आणि सामान्य मार्गाने वाहतो, परंतु मोठ्या एका बिळामध्ये पडल्यानंतर दुसरा प्रवाह कोठे गायब होतो हे कोणालाही माहिती नाही. हे कोड आजपर्यंत सुटलेलं नाहीये. इथून जाणारा रस्ता सुद्धा कुठे जातो हे पण एक रहस्य आहे.

5. स्टोनहेन्जइंग्लंडमधील विल्टशायरमध्ये राहणारा स्टोनहेज आजही सर्वांसाठी रहस्य आहे. ग्रेनाइटच्या या विशाल दगडांवर इंग्रजी, स्पॅनिश, स्वाहिली, हिंदी, हिब्रू, अरबी, चीनी आणि रशियन अशा आठ भाषांमध्ये लिहिलेल्या ओळी या जगासाठी एक कोडे आहेत. मात्र तज्ञांचा असा विश्वास आहे की, या दगडांमध्ये काही खगोलीय वैशिष्ट्य असू शकतात,परंतु या दगडांवर लिहिलेल्या रेषांचा अर्थ अद्याप कोणालाही समाजाला नाहीये.