पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी कोरना बाधित

0
489

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राज्यात सुमारे १४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ आहे. पुणे, मुंबईतील पोलीसांत घबराट आहे. आता पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.

दोन दिवसांपूर्वी (18 मे) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोनाची लागण झाली होती. या सहाय्यक निरीक्षकांच्या संपर्कात आल्याने एक पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा अहवाल बुधवारी (दि. २०) प्राप्त झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला 15 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस अस्वस्थ वाटत असल्याने आपल्याला पत्नीला भेटायला जायचे म्हणून या अधिकाऱ्यांने रजेचा अर्ज केला होता. रजा मंजूर होत नव्हती. स्वतः पोलीस आयुक्तांनी या अधिकाऱ्याची समजूत काढली. आज त्याचा रिपोर्ट आल्यावर सर्वांचीच पाचावर धारण बसली.
पिंपरी चिंचवड पोलीस कोरोनापासून तसे खूप दूर होते. गेल्या पंधरा दिवसांत दोनजण सापडले. त्यामुळे आयुक्तालयाचे दोन वेळा सॅनिटायझेशन केले होते. आत्ता पुन्हा एकदा सॅनिटायझेशन करण्यात येते आहे. एकूण सात जणांना बाधा झाल्याने पोलीस आयुक्तालयच कोरोनाग्रस्त झाले आहे. शहरात एकाद्या इमरतीत कोरोनाचा रुग्ण सापडला तर ती इमारत सील कली जाते. आता पोलिस आयुक्तालय सील करायचे म्हटले तर काय परिस्थिती आढावेल याचीच चर्चा पोलिसांमध्ये रंगली आहे.