पोलिसांनी सापळा लावून केला तब्बल ‘एवढ्या’ किमतीचा गुटखा जप्त

0
253

पिंपरी, दि. 8 (पीसीबी) : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाताना एका किराणा दुकानदाराला वाकड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 85 हजार 800 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 6) पहाटे पावणे दोन वाजता पुनावळे येथील अंडरब्रिज जवळील सर्व्हिस रोडवर करण्यात आली.

राजुराम गणेशराम देवाशे (वय 18, रा. शिंदेवस्ती, मारुंजी, हिंजवडी) असे अटक केलेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी एकजण घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पुनावळे येथील अंडरब्रिज जवळील सर्व्हिसरोडवर सापळा लावून आरोपी देवाशे याला ताब्यात घेतले. देवाशे मोपेड दुचाकी (एम एच 12 / पी व्ही 5013) वरून गुटखा घेऊन जात होता. त्याच्याकडून 85 हजार 800 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.