एटीएम कार्ड चोरून तब्बल ‘एवढी’ रक्कम केली चोरट्यांनी लंपास

0
202

पिंपरी, दि.8 (पीसीबी) : तरुणीचे एटीएम कार्ड चोरून त्या कार्डद्वारे दोन ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून 15 हजार रुपये काढून घेतले. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक्षा अमोल सांडभोर (वय 27, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी. मूळ रा. आनंद नगर, कळवाईस, ठाणे) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सांडभोर यांचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरी केले. त्याआधारे चोरट्याने काळेवाडी आणि थेरगाव येथील दोन एटीएम सेंटरमधून एकूण 15 हजार रुपये सांडभोर यांच्या संमतीशिवाय काढून घेतले. हा प्रकार 29 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी साडेचार ते पाच या कालावधीत घडला असून याबाबत 7 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.