पोलिसांनी ड्रग्ज रॅकटचे कंबरडे मोडले

0
237

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणापासून सुरू झालेला ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे बाॅलिवुडमधील चांगल्या चांगल्या हस्तींपर्यंत सापडले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, भारती सिंग, अर्जुन रामपाल आणि आता करण जोहारपर्यंत सर्वजण अमली पदार्थ्यांच्या चौकशीमध्ये सापडले. त्यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे, ती म्हणजे वसई-विरार पोलील आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मिरारोडवरून ३५ लाखांचे अमली पदार्थ म्हणजेच मेफोड्राॅन (एमडी) जप्त केले आहेत.

अमली पदार्थ्याच्या या मोठ्या साठ्यासह दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पाटील, मते आणि केंद्रे यांनी सोमवारी डेल्टागार्डन परिसरातून संशयास्पदरित्या दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन व्यक्तींना हटकले. अधिक चौकशी आणि नंतर अंगझडती घेतली असता एकाकडून (नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत) त्यांच्याकडून २०० ग्रॅम (२० लाखांचे) आणि दुसऱ्याकडून १५० ग्रॅम (१५ लाखांचे) अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. दोघेही आरोपी अनुक्रमे १९ व २० वर्षांचे असून गोळीबार रोड, सांताक्रूझ येथील रहिवाशी आहेत.

या दोघांवरही काशिमिरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८/क,२१/क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख करत आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त वसई विरार अप्पर पोलीस आयुक्त मिरा भाईंदर विजयकांत सागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र वेनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सोपनि प्रवीण स्वामी, विलास कुंटे, पोउपनि चेतन पाटील, पो. ह. जनार्दन मते, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, किशोर वाडीले, संतोष जगताप यांनी केली.