पोटच्या मुलीची हत्या करुन बापाने घेतला गळफास

0
526

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पोटच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर बापाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना धनकवडी येथील काशिनाथ पाटीलनगर येथे शनिवारी रात्री घडली.

आशिष भोंगळे (वय ४९) असे मुलीची हत्या करुन आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषचे पत्नीसोबत सतत भांडणे होत असल्याने दोघे वेगळे राहत होते. तर आशिष हा आई आणि त्याच्या दोन मुलासोबत धनकवडी येथील काशिनाथ पाटीलनगर येथे राहत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास आशिष यांची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या. त्याच दरम्यान मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आशिषने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकारनगर पोलीस तपास करत आहेत.