पेट्रोल, डिझेल जीएसटी कक्षेमध्ये घ्यावे; पिंपरी-चिंचवडमध्ये युवक काँग्रेसची इंधन दरवाढी विरोधात निदर्शने

0
545

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज (गुरूवारी) शहरातील विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुदंन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुरवातीस दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात करण्यात आली होती.