‘पृथ्वी शॉ लहान, त्याला काळजीपूर्वक हाताळा’- हर्षा भोगले

0
700

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहावे लागणार आहे. पृथ्वी शॉवर बीसीसीआयने आठ महिन्यांची क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले.

आहे. पृथ्वी शॉ हा लहान आहे. त्याला काळजीपूर्वक हाताळावे आणि योग्य मार्ग दाखवावा. या लहान मुलाने कठोर मेहनत करून यश मिळवले आहे, असे हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीत दोषी ठरला आहे. पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. पृथ्वीवर कारवाई करण्यात आल्यानंतर रात्री अकरा वाजता हर्षा भोगले यांनी एक ट्विट करून तो लहान असून त्याला योग्य प्रकारे हाताळण्याचा सल्ला दिला आहे. ‘या लहान मुलाने कठोर मेहनत करुन यश मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटने पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळायला हवं आणि त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा, असे भोगले यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलं आहे. बीसीसीआयकडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असणार आहे. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.