मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश

0
834

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  मुंबईतील गरवारे कल्बमध्ये आज (बुधवार) काँग्रेस –राष्ट्रवादीतील आमदारांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच काँग्रेसचे  नेते व आमदार कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतरही नेते भाजपमध्ये येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. शरद पवार असे म्हणत आहेत की ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केले जात आहे. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला.

राईट पर्सन इन द राईट पार्टी हे आजचे भाजपमधील  चित्र आहे,  असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  सांगितले.

आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करायचे आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे असे मधुकर पिचड यांनी म्हटले . आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगले काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे, असेही पिचड म्हणाले.