पुलवामा दहशतवादी हल्यातील मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझीचा खात्मा

0
660

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – पुलवामा दहशतवादी हल्यातील मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझीचा भारतीय जवानांनी खात्मा केला.  पुलवामा येथील पिंगलान भागामध्ये भारतीय जवान  आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक उडाली. यात गाझी ठार  झाला.  

पिंगलानमध्ये भारतीय जवानांनी शोध मोहिम सुरू केली आहे.  यावेळी पुलवामाच्या मुख्य तीन सूत्रधारांपैकी अब्दुल गाझी आणि त्याचे साथीदार एका इमारतीमध्ये लपून बसल्याची माहिती  जवानांना मिळाली. या इमारतीला जवानांनी घेराव घालून इमारतीत स्फोट करुन उडवून देण्यात आली. यामध्ये अब्दुल रशिद गाझी ठार झाला आहे.

या कारवाईमुळे लष्कराला मोठे यश  आले आहे. गाझीचा आयईडी बॉम्ब बनवण्यात हातखंडा होता. दरम्यान,  या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर डी.एस. डोंडीयाल यांचा समावेश आहे. तसेच सावेराम, अजय कुमार, हरी सिंग हे जवानही शहीद झाले आहेत. हे जवान ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफमधील  आहेत.