पुण्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू, २९४ नवे रुग्ण आढळले तर २२९ रुग्ण कोरोना मुक्त

0
264

पुणे, दि. ०४ (पीसीबी) – कोविड १९ (कोरोना) व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. पुण्यामध्ये गेल्या २४ तासात ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर २९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पुणे शहरामध्ये सध्या एकुण २३८९ कोरोना रुग्ण आहेत. काल (दि ०३) रोजी आढळुन आलेले २८९ रुग्णांपैकी २२२ रुग्ण नायडू रुग्णालय, १७ रुग्ण ससून रुग्णालय तर ५५ रुगण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी करण्यात आले आहे.

आजपर्यंत पुण्यामध्ये ४३४८ कोरोनाबाधीत रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. काल दिवसभरात २२९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात ३५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, आणि आतापर्यंत पुणे शहरात ७०८९ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.