संरक्षण मंत्रालयातही घुसला ‘कोरोना’

0
254

अनेक अधिकारी होम क्वारंटाईन

नवी दिल्ली, दि.०४ (पीसीबी) – दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना आता तो संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे आढळले आहे. नायब राज्यपाल यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता संरक्षण मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यावर अनेक अधिकाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली आहे. तसेच या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.