पुण्यात सोसायटीतील जलतरण तलावात दोन चिमुकल्या बुडाल्या

0
1259

पुणे, दि. ३ (पीसीबी) –  सोसायटीतील जलतरण तलावात दोन चिमुकल्या अचानक बुडाल्या. सुदैवाने ही बाब लक्षात येताच दोघींनाही तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना रविवारी (दि.२) दुपारच्या सुमारास  कोंढव्यातील तालाब कंपनीसमोरील एच. एम. सोसायटीमध्ये घडली.

बतुल (वय ८) आणि हुसैना (३ महिने) असे तलावात बुडालेल्या दोघा चिमुकल्या मुलींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोरील एच. एम. सोसायटीमध्ये बतुल आणि हुसैना खेळत होत्या. यावेळी सोसायटीच्या आवारातील जलतरण तलावात त्या दोघी खेळता खेळता बुडाल्या. हे लक्षात येताच सोसायटीतील नागरिक आणि नातेवाईकांनी बतुल आणि हुसैना या दोघींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघीची तब्येतीत सुधारणा होत आहे. पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.