कणकवलीत शरद पवार, नारायण राणे भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण    

0
821

सिंधूदुर्ग, दि. ३ (पीसीबी) – गेले दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  दरम्यान, आज (सोमवार) दुपारी पवार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट होणार आहे. या भेटीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पवार आणि राणे यांच्यामध्ये कोणती खलबते होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.  

कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर पवार आणि  नारायण राणे यांची भेट होणार आहे. मात्र ही भेट कोणत्या कारणासाठी होणार आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र आज दुपारी एक वाजता ते राणे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, पवार व राणे यांच्या भेटीला राणे यांचे पूत्र नितेश राणे यांनीही दुजोरा दिला.  कोकणात राणेंची ताकद संपलेली आहे. मात्र, राणेंची ताकद काय आहे, हे सर्वांना माहित आहे. राणेंशिवाय येथील पान हलत नाही. आज जिल्ह्यात कुणीही नेता, मंत्री आला तरी तो राणेंची भेट घेतल्याशिवाय कोकणातून जाऊ शकत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.