पुण्यात वकीलाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
2736

पुणे, दि. १८ (पीसीबी) –  मुंबर्इ उच्च न्यायालयात वकीली करणाऱ्या पुण्यातील एका वकीलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.१५) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याप्रकरणी पिडितेच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश पवार, शुभम सावंत आणि संकेत खुटवड या तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तिघा आरोपींनी संगनमत करुन पिडित मुलीस  कॉल करुन एका इमारतीच्या छतावर घेऊन गेले. त्यानंतर तिच्याकडील बॅग व मोबार्इल घेवुन तिच्या सोबत गणेश पवार याने जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. तसेच शुभम सावंत आणि संकेत खुटवड यानींही तिचा विनयभंग केला.  याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले तपास करत आहेत.